Ad will apear here
Next
‘श्रावण-प्रबोधन’ व्याख्यानमालेचे आयोजन
‘श्रावण-प्रबोधन’ व्याख्यानमालेचे आयोजनठाणे : येथे परिवर्तन न्यास आणि कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ‘श्रावण-प्रबोधन’ व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प नुकतेच पार पडले. यंदा या व्याख्यानमालेला पाच वर्षे पूर्ण झाली. 

‘देशाच्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करून, व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन सकल समाजाला शिक्षित केल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास होणार नाही,’ असे मत अर्थतज्ज्ञ, विचारवंत व राज्यसभेचे खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. ‘देशातील सद्यस्थिती’ या विषयावर ते बोलत होते.

कार्यक्रमामध्ये नगरसेवक संजय भोईर, उषा भोईर, ‘परिवर्तन न्यास’चे प्रमुख समन्वयक मोहन पाटील, डॉ. ए. डी. सावंत, गणेश नाईक, भरत ठाकरे, शांताराम पाटील, पी. सी. पाटील या वेळी उपस्थित होते. मोहन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमाचे द्वितीय सत्र रविवारी, सहा ऑगस्ट रोजी असून, त्यात विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांचे ‘शोध सुखाचा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तृतीय सत्र शनिवारी, बारा ऑगस्ट रोजी होणार असून, त्यात समाजसेवक व समीक्षक डॉ. विश्वंभर चौधरी यांचे ‘घटनात्मक राष्ट्रवाद’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवारी, २० ऑगस्ट रोजी ‘आयबीएन लोकमत’चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांचे ‘बदलती प्रसारमाध्यमे, बदलता समाज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : रविवार, सहा ऑगस्ट २०१७
वेळ : सायंकाळी चार ते साडेपाच
व्याख्यान : डॉ. विजया वाड
विषय : ‘शोध सुखाचा’

दिवस : शनिवार, १२ ऑगस्ट २०१७
वेळ : सायंकाळी चार ते साडेपाच
व्याख्यान : डॉ. विश्वंभर चौधरी
विषय : ‘घटनात्मक राष्ट्रवाद’

दिनांक : रविवार, २० ऑगस्ट २०१७
वेळ : सायंकाळी चार ते साडेपाच
व्याख्यान : महेश म्हात्रे
विषय : बदलती प्रसारमाध्यमे, बदलता समाज
स्थळ : हायलँड रेसिडेन्सी हॉल, कापूरबावडी, ठाणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZXDBF
Similar Posts
ठाण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात खासगी व लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या २० एमएलडी क्षमतेच्या पाणी विक्षारण आणि १० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली. अशा पद्धतीचे प्रकल्प राबविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे
ठाणे शहरात आरोग्य शिबिरे,औषध फवारणी ठाणे :   नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर साथीचे आजार फैलावू नयेत, यासाठी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत तातडीने आरोग्य शिबिरे घेण्याचे आदेश  दिले. त्यानुसार आरोग्य विभागाच्यावतीने शहरात ठिकठिकाणी जवळपास २२ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या
स्वामी चिद्विलासानंदाचा जन्मदिन महोत्सव साजरा ठाणे : आध्यात्मिक गुरू स्वामी चिद्विलासानंद यांचा जन्मदिन सोहळा तानसा खोऱ्यातील आदिवासींनी २४ जून रोजी उत्साहात साजरा केला. या निमित्ताने प्रसाद चिकित्सा धर्मदाय संस्थेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात स्थानिक आदिवासी, महिला आणि बालकवर्गाचा विशेष सहभाग होता. या महोत्सवाची सुरुवात वृक्ष लागवड अभियानाने झाली
विविध प्रकल्पांचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन ठाणे : इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर, वर्किंग वूमन्स हॉस्टेल आणि ग्रँड सेंट्रल पार्क या शहराच्या लौकिकात भर टाकणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कम्युनिटी पार्क आणि https://www.maha.ooo/ या वेबसाइटचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि सार्वजनिक

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language